निवजे चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना आमदार निलेश राणे यांचा दिलासा

पीडित कुटुंबियांना मदत मिळवून देणार
कुडाळ तालुक्यात निवजे गावात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार निलेश राणे यांनी केली. पीडित आणि नुकसानग्रस्त कुटुंबियांना मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी माणगाव खोऱ्यातील निवजे गावात चक्रीवादळाने गावातील घरांचे मोठे नुकसान झाले. होते. या शक्तिशाली वादळाचा मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत गावातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून, संसारोपयोगी साहित्याचेही अपरिमित नुकसान झाले आहे. या वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि पीडित कुटुंबांना आधार देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी निवजे गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान, नुकसानग्रस्त कुटुंबांना वैयक्तिक स्तरावर तातडीची मदत देण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, शिवसेना जिल्हा प्रमुखसंजू परब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, शिवसेना तालुका प्रमुख कुडाळ विनायक राणे, मागासवर्गीय तालुका प्रमुख कुडाळविजय जाधव, विभाग प्रमुख नागेश आईर आदी मंडळी उपस्थित होती.





