संजय घोडावत इंडस्ट्रियल पार्कचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

मजले ता हातकणंगले येथील संजय घोडावत इंडस्ट्रियल पार्क मध्ये भूमिपूजन सोहळा गुरुवार, दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता मोठया उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला जिल्ह्यातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार डॉ. अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, डी. वाय. पाटील ग्रुपचे चेअरमन संजय डी. पाटील, संजय पाटील यड्रावकर, चकोते ग्रुपचे चेअरमन अण्णासाहेब चकोते, तसेच महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, हातकणंगले तहसीलदार सुशील बेलेकर, मजले गावच्या सरपंच मधुमती नेमिनाथ पाटील हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले, ” संजय घोडावत यांनी शैक्षणिक औद्योगिक आणि सामाजिक कार्यात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. हा औद्योगिक पार्क मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.”
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या इंडस्ट्रियल पार्कमुळे जिल्ह्यात औद्योगीकरणास चालना मिळेल असे मत व्यक्त केले. आमदार राहुल आवाडे व आमदार डॉ. अशोकराव माने यांनी या इंडस्ट्रियल पार्कच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी संजय घोडावत यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजय घोडावत इंडस्ट्रियल पार्कचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी भूषविले. यावेळी बोलताना संजय घोडावत म्हणाले, “औद्योगिक विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरणारा हा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवे औद्योगिक केंद्र ठरेल.” यावेळी संचालक राजेश घोडावत, व्यवस्थापकीय संचालक श्रेणीक घोडावत, विजयचंद घोडावत, राजेंद्र घोडावत विनोद घोडावत, सलोनी घोडावत, राकेश घोडावत, कविता घोडावत, विनायक भोसले, रवी चौधरी उपस्थित होते. तसेच कोल्हापूर, सांगली व इचलकरंजी परिसरातील अनेक उद्योगपती व व्यावसायिक उपस्थित होते.





