कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने सिंधुदुर्गच्या नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने स्वागत

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने सिंधुदुर्गच्या नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी रिक्षा टॅक्सी चालकांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कोकण विभागीय कार्याध्यक्ष संतोष नाईक, सहसचिव सुधीर पराडकर, कुडाळ तालुकाध्यक्ष रवी माने, मालवण तालुकाध्यक्ष संदीप सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश सावंत, मालवण तालुका उपाध्यक्ष सुनील पाताडे, ह्युमन राईट असोसिएशन प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग- रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर आदी उपस्थित होते.





