मालडी येथे नवरात्रोत्सवाचे आयोजन

मालवण तालुक्यातील मालडी येथील भावई देवी मंदिरात यावर्षीही नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. हा उत्सव २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान पार पडणार असून दररोज सायं. ७ वाजता भजन, ८ वाजता महाआरती, ८.३० ते १०.३० गरबा आणि त्यानंतर अल्पोपाहार आयोजित आहे.
१ ऑक्टोबर रोजी स्थानिक दसरा, देवाचे लग्न व सोने लुटणे कार्यक्रम तसेच रात्री ९ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमांचे Facebook Live प्रक्षेपण होणार असून नऊ दिवस देवीला नेसवण्यात येणाऱ्या साड्या सुमित नवीनचंद्र पराडकर तर अल्पोपाहार व महाप्रसादाचा खर्च ग्रामस्थांतर्फे केला जाणार आहे.
ग्रामस्थांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





