सिंधुदुर्ग जिल्हा बँके कडून सेवानिवृत्त ग्रामसेवकांना गोड बातमी!

सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाचे अध्यक्ष प्रकाश राणे व उपाध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व मुख्याधिकारी यांची भेट घेऊन गणपती सण सभासदांना आनंदात साजरा करता यावा म्हणून दिनांक २२ ऑगस्ट पासुन जिल्हा बँकेमध्ये सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाच्या निवृत्त वेतन खाते असलेल्या सभासदांना निवृत्तीवेतना एवढी आगावू रक्कम उचल द्यावी अशी मागणी केली. सदर मागणी बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी मान्य केल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. या पुर्वीही अशा प्रकारचे सहकार्य जिल्हा बँकेने वेळोवेळी केले आहे त्यामुळे बँकचे आभार मानण्यात आले. सभासदांनी ॲडव्हान्स रक्कम उचल करावी असे आवाहन सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाचे अध्यक्ष प्रकाश राणे व उपाध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी केले आहे.

error: Content is protected !!