पालकमंत्री नितेश राणे यांच्यामार्फत बुवा.संतोष कानडे यांनी केलेल्या मागणीला यश.

राज्य सरकार देणार 1800 भजनी मंडळान्ना 25 हजार रुपयांचे महाअनुदान.
मंत्री आशिष शेलार यांस कडून गणेशोत्सव निमित्त योजना जाहीर.
कणकवली/मयूर ठाकूर.
महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभलेली आहे.ही परंपरा जोपासण्याचं कार्य राज्यातील भजन मंडळ करीत असतात.कोकणामध्ये असंख्य भजनी मंडळे सक्रिय असून धार्मिक क्षेत्रात भजन या कलेला विशेष स्थान आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक वाडी वस्त्यांमध्ये भजन मंडळ कार्यरत असून भजनाच्या माध्यमातून संत परंपरेची जोपासना तसेच समाज प्रबोधन आणि भगवंताचे नामस्मरण केले जाते.या भजन मंडळांना आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारकडून अनुदान मिळावे अशी मागणी भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष बुवा श्री.संतोष कानडे यांनी केली होती.या मागणीला यश आले असून महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित, महाराष्ट्राच्या राज्य महोत्सवाअंतर्गत गणेशोत्सव निमित्त या योजनेची माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड आशिष शेलार यांस कडून घोषणा करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील 1800 भजन मंडळांना 25 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच जिल्ह्यातील भजन मंडळींना या महाअनुदानाचा लाभ मिळणार असल्याची माहिती बुवा संतोष कानडे यांनी दिली.तसेच या योजनेचा जास्तीत जास्त भजन मंडळींनी लाभ घ्यावा असे देखील आवाहन करण्यात आले.





