सिंधुदुर्गातील अन्य अवैध व अनैतिक धंदे कधी बंद होणार हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे!

ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांचा सवाल
महसूल मंत्री भेटले तो सावंतवाडीतील भाजपचा पदाधिकारी राजरोस मटका घेतो
पालकमंत्री नितेश राणे यांनी काल जुगार अड्डयावर केलेल्या कारवाई बद्द्दल त्यांना उशिरा सुचलेल शहाणपण आहे. शिवसेना ठाकरेच्या सर्व पदधिकाऱ्यांनी यापूर्वी कित्येक वेळा पोलीस प्रशासनकडे अवैध मटका, जुगार, गोवा बनावटीची दारू विक्री , गुटखा विक्री तसेच अवैध पेट्रोल विक्री या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोसपणे चाललेल्या अनैतिक प्रकारा बद्दल कित्येक निवेदने दिली होती. काल जी मटका व्यावसायिकावर धाड टाकली त्याबद्दल आपले कौतुकच आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा बनावटीची अवैध दारू विक्री, गुटखा विक्री तसेच अवैध पेट्रोल विक्री ही कधी बंद होणार याचाही खुलासा पालकमंत्र्यांनी करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाची तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत RTO चेकपोस्ट वरील एका रात्री चा खेळ चाले व्हिडिओ बाहेर आला, त्या चेकपोस्ट वरील कर्मचारी वर्गावर कारवाई होणार का? फक्त स्टंटबाजी नको ही अपेक्षा असल्यास टोला श्री. सावंत यांनी लगावला.
कणकवलीतील कालच्या टाकलेल्या मटका जुगार धाडीवर आपल्याला एकच सुचवतो कि सावंतवाडी तालुक्यात महसूलमंत्री ज्याच्या ज्याच्या घरी गेले त्यातीलही सावंतवाडीचा आपल्याच भाजपचा प्रमुख पदधिकारी राजरोस पणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा व मोठया प्रमाणात मटका जुगार चालवतो. त्याच्यावर सुद्धा कारवाई करून सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून नितेश राणे घेतलेल्या शपथीची जाणीव असल्याचे उदाहरण जनतेला देतील असा टोला तालुकाप्रमुख प्रथमेश मोहनराव सावंत यांनी लगावला आहे.





