विनयभंग केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

ऍड. राजीव बिले, ऍड दत्ताराम बिले आणि ऍड. हेमांगी वराडकर यांनी पाहिले काम

पीडित मुलीचा विनयभंग केल्याचा आरोपातून संशयित परशुराम उर्फ राजा केशव शेट्ये याची प्रमुख जिल्हा न्यायाधिश श्री. डॉ. सुधीर देशपांडे यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अॅड. राजीव बिले, दत्ताराम राजीव बिले, अॅड. हेमांगी वराडकर यांनी काम पाहीले.
याबाबत ऍड. राजीव बिले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १३ नोव्हेंबर २०२० रोजी आरोपी परशुराम उर्फ राजा केशव शेट्ये याने केळुस खऱ्याचा मार्ग येथे १७ वर्षीय पिडीत मुलगी आपल्या मित्राशी बोलत असताना पाहिले आणि तीचा मित्र निघून गेल्यानंतर पिडीत मुलगी घरी जात असतना आरोपी याने पिडीत मुलगीचा पाठलाग केला आणि तीला पाहून अश्लिल भाषेत बोलून आरोपीने पिडीत मुलगीचा विनयभंग केला. तीच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. म्हणुन पिडीत मुलगीच्या वडीलांनी निवती पोलिस स्टेशनमध्ये आरोपी परशुम उर्फ राजा केशव शेट्ये याचे विरोधात फिर्याद दाखल केली.
त्यानंतर पिडीत मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच पिडीत मुलीचा जबाब न्यायालयामध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम १६४ प्रमाणे नोंदविण्यात आला होता. त्याबाबत पोलिसांनी तपास करून आरोपीच्या विरोधान भारतीय दंड विधान १८६० चे कलम ३५४A (२) सह बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम १२ अन्वये आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र पाठविणेत आले होते. सदरील कामात सरकार पक्षाने सत्र न्यायालय ओरोस येथे एकंदरीत ८ साक्षीदार तपासले. सदर केस ओरोस येथील सत्र न्यायालयात चालली असता आरोपीचे बाजुने अॅड. राजीव बिले, दत्ताराम राजीव बिले, अॅड. हेमांगी वराडकर यांनी काम पाहीले.
आरोपीच्या विरोधात सबळ गुन्हा शाबित न केलेमुळे आरोपी परशुराम उर्फ राजा केशव शेट्ये याची प्रमुख जिल्हा न्यायाधिश श्री. डॉ. सुधीर देशपांडे यांनी निर्दोष मुक्तता केली.

error: Content is protected !!