भाजपात घरवापसी – कोकणात ठिकठिकाणी जंगी स्वागत. हजारो कार्यकर्त्यांचा वाहने आणि मोटरसायकलचा ताफा स्वागत रॅलीमध्ये सहभागी

विशाल परब आणि पदाधिकारी पक्षाने दिलेल्या प्रेमाने अक्षरश: भारावले
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबईमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील युवा नेतृत्व विशाल परब यांचे निलंबन मागे घेत पक्षात त्यांचे स्वागत केले. विशाल परब यांच्या समवेत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचेही निलंबन रद्द होऊन हे शेकडो कार्यकर्ते आता भाजपामध्ये सक्रियपणे काम करणार आहेत. मुंबईमध्ये पक्षाने केलेल्या स्वागतानंतर आता हे सर्व पदाधिकारी मागे फिरत असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत आहे. हजारो कार्यकर्ते वाहने आणि मोटरसायकलच्या ताफ्यासह या स्वागत रॅलीत सहभागी होताना दिसत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते – पदाधिकाऱ्यांनी या स्वागतातून दाखवलेल्या प्रेमाने विशाल परब आणि सोबतचे पदाधिकारी अक्षरशः भारावून गेले आहे. श्री,. विशाल परब हे भाजपा सक्रिय झाल्याने युवावर्गामध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य पसरल्याचे दिसून येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि पक्षाने दिलेल्या या प्रेमाबद्दल श्री. विशाल परब आणि पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहे.





