खारेपाटण येथील १ लाखाची दही हंडी संभाजीनगर गुरववाडी गोविंदा पथकाने फोडली

पालकमंत्री नितेश राणे यांची विशेष उपस्थिती

खारेपाटण एस टी बस स्थानक येथे भारतीय जनता पार्टी आयोजित व श्री सतीश गुरव पुरस्कृत सुमारे १ लाख ११ हजार १११ /- रुपयांची भव्य दहीहंडी बांधण्यात आली होती. या दहीहंडी उत्सवाला मंत्री नितेश राणे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
“आज देशात आणि राज्यात जी काही परिस्थिती चालू आहे.हे पाहता, आपले धार्मिक सन आणि उत्सव आपल्या जिल्ह्यात साजरे होतात ही अभिमानाची बाब आहे.दहीहंडी उत्सवासारख्या सना मधून आपली हिंदू संस्कृती जपणे काळाची गरज आहे.”असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी खारेपाटण येथे युवा उद्योजक श्री सतीश गुरव व भाजप पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहिहंडी उत्सवात उपस्थितींना मार्गदर्शन करताना काढले.
खारेपाटण एस टी बस स्थानक येथे भारतीय जनता पार्टी आयोजित व श्री सतीश गुरव पुरस्कृत सुमारे १ लाख ११ हजार १११ /- रुपयांची भव्य दहीहंडी बांधण्यात आली होती.या दहीहंडी उत्सवाला मंत्री नितेश राणे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.यावेळी भाजप तालुका अध्यक्ष श्री दिलीप तळेकर, श्री चिन्मय तळेकर, माजी जि. प. वित्त व बांधकाम सभापती श्री. रवींद्र उर्फ बाळा जठार, भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. रामकांत राऊत, तालुका सचिव सुधीर कुबल, शक्ती केंद्र प्रमुख श्री. सूर्यकांत भालेकर, श्री मधुकर शेठ गुरव यांसह आयोजक श्री. सतीश गुरव, सामाजिक कार्यकर्ते श्री. संकेत शेट्ये, श्री. संतोष पाटणकर, श्री. तेजस राऊत, श्री. निखिल गुरव, सनी गुरव, श्री. प्रवीण लोकरे, श्री. विजय देसाई, श्री. नंदकिशोर कोरगावकर, राजेंद्र वरूणकर, राजा जाधव, गणेश कारेकर, किशोर माळवदे, योगेश पाटणकर, प्रणय गुरसाळे, शेखर शिंदे, कुरंगावणे सरपंच श्री. पप्पू ब्रम्हदंडे तसेच महिला कार्यकर्त्या सौ तृप्ती माळवदे, तालुका कार्यकारणी सचिव, शक्तिकेंद्र प्रमुख-अंजली कुबल, तालुका कार्यकारणी सदस्य- उज्ज्वला चिके, साधना धुमाळे, ग्रा. पं सदस्य -मनाली होणाळे, शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते श्री मंगेश गुरव, सुकांत वरूणकर, गुरुप्रसाद शिंदे, मंगेश ब्रम्हदंडे, सुहास राऊत, श्री. सुधाकर ढेकणे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री नितेश राणे यांचे शुभहस्ते गावच्या विकासाची दही हंडी प्रातिनिधिक स्वरूपात फोडण्यात आली.यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले “माझ्या संपूर्ण राजकीय जडणघडणीत खारेपाटण या गावचे महत्त्व खूप मोठे आहे.त्यामुळे माझ्या मंत्री पदाच्या कार्यकाळात खारेपाटण गावच्या विकासासाठी प्रथम प्राधान्य देणार असून गावच्या विकासासाठी एकही रुपया निधी कमी पडू देणार नाही.असे दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्ते व ग्रामस्थाना सांगितले.
दरम्यान खारेपाटण येथील दहीहंडी उत्सवाला रत्नागिरी व सिंधूदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख १५ गोविंदा पथकांनी उपस्थिती लावून आकर्षक व चित्तथरारक अशा ७ थरांच्या सलामी दिल्या तर राजापूर येथील महिला गोविंदा पथकाने सुद्धा दहीहंडी फोडण्यासाठी सुसूत्रबध असे ५ थर लावून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.सहभागी सर्व गोविंदा पथकानं आकर्षक चषक व रोख रकमेचे बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर खारेपाटण मधील १ लाख रकमेची ही भव्य दहीहंडी फोडण्याचा मान खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील गोविंदा पथकाला देण्यात आला.त्यांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन श्री सतीश गुरव यांचे शुभहस्ते गौरविण्यात आले.

error: Content is protected !!