कुरंगवणे -बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पदी बाबला गोसावी यांची बिनविरोध निवड

कुरंगवणे-बेर्ले ग्रामपंचायत ची मासिक सभा ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच 11ऑगस्ट रोजी पार पडली.सरपंच पप्पू ब्रह्मदंडे यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा झाली त्या सभेदरम्यान उपसरपंच निवडणूकीचा निर्णय घेण्यात आला तरी उपसरपंच पदी बाबला गणपत गोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.गेली अडीच वर्षे उपसरपंच पदी निवृत्ती श्रीधर पवार होते.त्यांनी एप्रिल मध्ये आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली.या प्रसंगी उपस्थित सरपंच पप्पु ब्रम्हदंडे, सदस्य निवृत्ती पवार, बाबला गोसावी, रविंद्र पवार, विशाखा राऊत, अक्षदा सादिकले, स्नेहा गोसावी, सारिका कुडाळकर ग्रामपंचायत अधीकारी गिरीश धुमाळे इ. उपस्थित होते.

error: Content is protected !!