गोपुरी आश्रम येथे मेंदूचा खुराक या विषयावर कार्यशाळा

पत्रकार संपादक लेखक व अनुवादक सुनील तांबे करणार मार्गदर्शन

जीवन शिक्षण शाळा गोपुरी आयोजित मेंदूचा खुराक या विषयावर 17 ऑगस्ट रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी व इंग्रजी पत्रकार संपादक लेखक व अनुवादक सुनील तांबे हे या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. गोपुरी आश्रमाच्या गणपतराव सावंत सभागृहात सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत ही कार्यशाळा होणार असून या कार्यशाळेमध्ये दुसरी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी सदाशिव राने 94 23 33 14 19 विनायक सापळे ९४०४९४०२१७, संदीप सावंत, अर्पिता मुंबरकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!