खारेपाटण फिडरचे विभाजन होणार, कलमठ मधील वीज प्रश्न सुटणार

15 ऑगस्ट रोजी चे राजू राठोड व शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन स्थगित
उपकार्यकारी अभियंत्यांकडून लेखी आश्वासन
कलमठ गावातील विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असताना देखील याबाबत कोणतीही उपाययोजना होत नसल्याने कलमठ ग्रामस्थांना या समस्येचा त्रास सहन करावा लागतो. गणेश चतुर्थीच्या तोंडावर देखील सातत्याने हा वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज वितरण च्या विरोधात नाराजी व्यक्त करत ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी राजू राठोड यांच्यासह ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. अखेर या बाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांनी खारेपाटण फिडरचे विभाजन करण्याचा प्रस्ताव आर डी एस एस या योजनेअंतर्गत प्रस्तावित आहे. यासाठी चे सर्वेक्षण देखील पूर्ण करण्यात आले आहे. या कामाच्या करिता पायाभूत सुविधांची उभारणी करणे आवश्यक आहे. तसेच यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नगरपंचायत यांच्या परवानगी घेण्याची कामही सुरू आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट चे उपोषण स्थगित करण्याची विनंती उपकार्यकारी अभियंता यांनी केली. त्यानुसार हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले अशी माहिती राजू राठोड यांनी दिली. हे काम लवकर सुरू न झाल्यास पुन्हा उपोषण छेडण्यात इशारा देण्यात आला आहे.




