खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने गणेश उत्सव पूर्व तयारी अंतर्गत करण्यात आली पायवाट साफसफाई

खारेपाटण ग्रामपंचायत चा पुढाकार

खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गावातील सर्व प्रभागातील अंतर्गत पायवाटा व मुख्य रस्ते यांच्या साफ सफाई व स्वच्छता करण्याचे काम नुकतेच हाती घेण्यात आले असून गणेश आगमनाच्या अगोदर सर्व पायवाटा त्यावर वाढलेली राणे झुडपे साफ करून स्वच्छ करणार असल्याचे सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी यावेळी सांगितले.
याबाबत प्रत्यक्ष कामाची सुरवात करताना खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,उपसरपंच श्री महेंद्र गुरव ग्रा.पं.सदस्य श्री जयदीप देसाई,ग्रामपंचायत कर्मचारी श्री राजेश जाधव ,उमेश राऊत,अजय तेली,संदेश पाटणकर आदी उपस्थित होते.तर खारेपाटण गावातील सर्व विद्युत पोलवर दिवाचत्ती लावणे तसेच वाडीवार पायवाटा स्वछ करणे आदी कामे गणेश चतुर्थी पूर्वी करण्यात येतील असे खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.

error: Content is protected !!