इंस्टाग्रामवर महिलेचे अश्लील फोटो प्रकरणी एकास अटक

कुडाळ पोलिसांची कामगिरी

संशयितास १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

महिलेचे बनावट इंस्टाग्राम तयार करून त्या इंस्टाग्रामवर तिचे अश्लील व्हिडिओ फोटो व संदेश पाठवून फिर्यादीकडे तिच्या मोबाईलची मागणी करून तो न दिल्यास फोटो इंस्टाग्रामवर प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी संजय कृष्णा जाधव (वय वर्ष 25 रा. कारिवडे जाधववाडी ता. सावंतवाडी) याला कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केलेली आहे.
याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेचे अज्ञात आरोपीत याने बनावट इंस्टाग्राम तयार करून त्या इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ फोटो व संदेश पाठवून फिर्यादीकडे तिच्या मोबाईलची मागणी करून तो न दिल्यास फोटो इंस्टाग्राम वर प्रसारित करण्याची धमकी दिली. याबाबत तक्रारदार महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी त्याचे विरुद्ध कुडाळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दिनांक 26 जुलै 2025 रोजी दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याच्या तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे करत होते. गुन्ह्याच्या तपासात हा गुन्हा संजय कृष्णा जाधव वय वर्ष 25 रा. कारिवडे जाधववाडी ता. सावंतवाडी यांने केल्याबाबत पुरावा मिळून आला. त्यामुळे त्यास या गुन्ह्याच्या कामी दि 01 ऑगस्ट 2025 रोजी अटक करून ताब्यात घेण्यात आले. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. आरोपीने गुन्हा करण्याकरता वापरलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केलेला आहे. या संशियत आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केलेली आहे.
या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर, संजय कदम, योगेश वेंगुर्लेकर आणि प्रमोद काळसेकर यांनी काम पहिले.

error: Content is protected !!