वकृत्व स्पर्धेत अन्वेषा पांगे सही घुटुकडे कस्तुरी परुळेकर प्रथम

आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा या प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रथम गटात अन्वेशा अनिकेत पांगे, द्वितीय गटात सही अंकुशराव घुटुकडे तर तृतीय गटात कस्तुरी नितीन परुळेकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेत प्रथम गटात मीहीर गोवंडे द्वितीय ,यज्ञवि धुळे तृतीय ,तर उत्तेजनार्थ सृष्टी माटवकर दुर्वा आचरेकर यांना गौरविण्यात आले द्वितीय गटात भाविका चव्हाण द्वितीय किंजल परब तृतीय, उत्तेजनार्थ नुर्वी शेडगे ,एंजल फर्नांडिस, तृतीय गटात प्रथमेश पुजारे द्वितीय, श्रेया घाडी तृतीय, उत्तेजनार्थ झिन्निश शेख,दुर्वेश अपराज यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेत एकूण 53 मुलांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचे परीक्षण सौ कदम साटेलकर, रावले, सौ भावना मुणगेकर ,जाधव, पारिपत्ते यांनी पाहिले कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक अंकुशराव घुटुकडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी उपमुख्याध्यापिका मधुरा माणगावकर यांसह अन्य शिक्षक आदी उपस्थित होते.