रुग्णवाहिका व्यावसायिक सिरील फर्नांडिस यांचे निधन

कणकवली शहरातील रुग्णवाहिका व्यावसायिक सिरील गॅब्रीएल फर्नांडिस ( वय 58, रा. फणसवाडी,वरवडे ) यांचे अल्पशा आजाराने वैद्यकीय उपचारादरम्यान गोवा बांबुळी येथे शुक्रवार 18 जुलै रोजी पहाटे निधन झाले. सिरील फर्नांडिस हे रुग्णवाहिका व्यावसायिक म्हणून कणकवली शहरात सुपरिचित होते. वरवडे ग्रामपंचायत चे माजी उपसरपंचपदही त्यांनी भूषविले होते. गोवा बांबुळी येथे मागील काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान आज पहाटे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चत पत्नी, तीन मुलगे, सुना असा परिवार आहे. शनिवार 19 जुलै रोजी फणसवाडी येथील सिमित्रीमध्ये त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.