महामार्गावर जानवली येथे ट्रक बॅरिकेट मध्ये घुसला

रविवारी पहाटेच्या सुमारास घडला अपघात

महामार्गावर जानवली येथील हॉटेल रिलॅक्स नजीक आज रविवारी पहाटेच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेटच्या कठड्यावर घुसल्याने महामार्गाला लावण्यात आलेली लोखंडी बॅरिकेट अक्षरशः चकाचूर होत तुटून गेली. जवळपास 100 मीटर हून अधिक भागातील बॅरिकेट तुटून त्याचा अक्षरशा चक्काचूर झाला. सुदैवाने चालकाला दुखापत झाली नसली तरी पहाटेच्या सुमारास झोपेत असताना ट्रक चालकाकडून हा अपघात झाल्याचे समजते . यामुळे महामार्गावर अक्षरशा चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. दरम्यान या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना देण्यात आली असून त्याच स्थितीत तेथे असलेला ट्रक बाजूला काढण्याची गरज आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!