कणकवलीतील फ्लाय ओव्हर ब्रिज जवळील “त्या” भागाला पॅचवर्क

फ्लाय ओव्हर ब्रिजला कोणताही धोका नसल्याचे महामार्ग प्राधिकरण कडून स्पष्ट

महामार्गावरील पडलेले मोठे खड्डे पेव्हर ब्लॉकने बुजवणार

कणकवली शहरात फ्लाय ओव्हर ब्रिजला स्टेट बँकेसमोरील दोन पिलरच्या जॉईंट जवळ एक मोठा तडा जात या ठिकाणचा पुलाच्या काँक्रीट चा काही भाग खाली कोसळण्याच्या स्थितीत असल्याबाबत ची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर या भेग गेलेल्या भागातील तुटलेल्या काँक्रीट तुकड्याला
सिमेंट च्या माध्यमातून पॅचवर्क करण्यात आले आहे. तसेच फ्लाय ओव्हर ब्रीज ला कोणताही धोका नसल्याची माहिती महामार्ग प्राधिकरण च्या सूत्रांनी दिली. तसेच या ठिकाणी काँक्रीट चा सुटलेला भाग हा ब्रीज चे काम करताना प्लेट खाली आल्याने त्या स्थितीत दिसत होता. परंतु यामुळे कोणताही धोका नव्हता असे महामार्ग प्राधिकरणाने टेक्निकल टीमच्या पाहणी अंति स्पष्ट केले आहे. या काँक्रीटच्या तुकड्यामुळे येत्या काळात कोणताही अपघात होऊ नये म्हणून महामार्ग प्राधिकरण च्या सूचनेनुसार ठेकेदार कंपनी कडून मंगळवारी रात्री सिमेंट चा पॅच मारण्यात आला. दरम्यान महामार्ग प्राधिकरण च्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी काही दिवसांपूर्वी या भागाची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी दोन दिवसात टेक्निकल टीम येऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर नुकतीच या टेक्निकल टीमने पाहणी केली तसेच ठेकेदार कंपनीच्या तज्ञांकडून याची पाहणी करण्यात आली. दरम्यान कणकवली शहरासह महामार्गावर पडलेले मोठे खड्डे बुजवण्याबाबत पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यात येणार आहे. तशा सूचना देखील ठेकेदार कंपनीला देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्विस रोडच्या डांबरीकारणाचे काम करायचे होते. मात्र पाऊस लवकर सुरू झाल्याने हे काम प्रलंबित राहिले. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामांमध्ये अनेक त्रुटी असताना या त्रुटींच्या अनुषंगाने उपाययोजना होण्याची गरज होती. फ्लाय ओव्हरब्रिज च्या कामाच्या दर्जाबाबतही अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिजला जोडला जाणारा बॉक्सेल ब्रिज हा दोन ठिकाणी कोसळला होता. परंतु सद्यस्थितीत फ्लाय ओव्हर ब्रिज सुस्थितीत असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणच्या सूत्रांनी दिली. तसेच लवकरच खड्डे बुजवण्याचे काम ही हाती घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

error: Content is protected !!