श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम संकेतस्थळाचे उद्घाटन व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप

कार्यक्रमाची सुरुवात सुरेल आवाजात रामकृष्ण गुरुकुल संगीत विद्यालयाचे गुरुवर्य योगेश प्रभू यांच्या विद्यार्थ्यांनी केली..माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमात नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सुरेश बिर्जे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ट्रस्टच्या माध्यमातून एकूण पाच गरजू विद्यार्थ्यांना शालेय वार्षिक खर्चासाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली.
या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत चेंदवण हायस्कूल, वालावल हायस्कूल, नेरुर हायस्कूल, माड्याचीवाडी हायस्कूल व पाट हायस्कूल या पाच हायस्कूलमधील प्रत्येकी एका गरजू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.सदर रक्कमेचा चेक विद्यार्थ्यांना देण्यात आला
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सागर मानिक पवार, संत राऊळ महाराज कॉलेजचे विद्यार्थी व प्राध्यापक प्रशांत केरवडेकर, संतोष चौगुले, प्रिया कसालकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. जिव्हाळा सेवाश्रमाची वेबसाईट असावी अशी कल्पना प्रथम पुणे रहवासी उमेश कुडाळकर आणि त्यांचे अमेरिकेत असणारे मित्र विनायक तेंडोलकर यांनी मांडली.. आणि संत राऊळ महाराज काॅलेजच प्राध्यापक प्रशांत केरवडेकर यशस्वी देसाई.. आणि विद्यार्थी यांनी यांनी खूप मेहनत घेतली.. आणि त्याचा परिणाम म्हणून आज वेबसाईट ओपनिंग झाले.. तसेच प्राध्यापक संतोष चौगुले प्रिया कसालकर व विद्यार्थी समिक्षा सांवत,आदिती देसाई, दिक्षा प्रभूकेळूसकर.सृष्टी सामंत ऋतुजा पोपकर,शुभम गावडे,प्रजेश शेट्टी, श्रेयस वेंगुर्लेकर ,साईल सावंत यांचे मोलाचे योगदान लाभले
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष राजू बिर्जे, सचिव संदीप बिर्जे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बिर्जे, खजिनदार साक्षी बिर्जे, सनातनचे प्रमुख राजू पाटील,तसेच सदस्य सुंदर मेस्त्री, संतोष सांगळे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास उमेश देसाई, बाबा गावडे, गौरव घनःश्याम देसाई, सामंत ,पिंगुळकर, शोभा बिर्जे, गीतांजली बिर्जे हेही मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयप्रकाश प्रभू यांनी तर सूत्रसंचालन प्राजक्ता परब यांनी केले.