वृक्षसंवर्धनाचा त्रिंबक गावचा उपक्रम कौतुकास्पद -सपोउ मिनाक्षी देसाई

ग्रामपंचायत त्रिंबक आणि जागृत उन्नती मंडळ त्रिंबक यांच्या संयुक्त उपक्रमाने वृक्षारोपण संपन्न
आचरा-अर्जुन बापर्डेकर
वृक्ष संवर्धन हि काळाची गरज आहे आणि त्यासाठी त्रिंबक गावातर्फे सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे उद्गार आचरा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिनाक्षी देसाई यांनी त्रिंबक येथे काढले.
ग्रामपंचायत त्रिंबक आणि जागृत उन्नती मंडळ त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने
सापळा त्रिंबक येथे वृक्षारोपण
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी त्यांच्या सोबत त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर,जागृत ऊन्नती मंडळ त्रिंबक मुंबई अध्यक्ष दत्ता पवार, कार्याध्यक्ष
चेतन साटम. सचिव
अरविंद कदम. खजिनदार
संतोष त्रिंबककर सदस्य
अनिल कदम. सुनील जाधव.
ग्रामीण शाखेचे
बाळा बागवे. ऊदय मेहेंदळे. पुजा सुतार. विलास त्रिंबककर.
संतोष घाडीगांवकर. सिताराम सकपाळ. सुचिता घाडीगांवकर.
प्रदीप दामले.तसेच सुरेंद्र सकपाळ आशिष बागवे,अशोक बागवे, श्रीकांत बागवे प्रविण घाडीगांवकर आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी २०० झाडे लावून त्रिंबक गाव हरीत करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते
या प्रसंगी जनता विद्या मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात १० वी पास झालेल्या पहील्या पांच मुलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऊदय मेहेंदळे यांनी प्रास्ताविक करतांना मंडळाच्या स्थापनेचा ऊद्देश स्पष्ट केला. जागृत ऊन्नती मंडळाचे अध्यक्ष दत्ता पवार यांनी त्रिंबक गावाच्या एकूण विकासा करीता मंडळ सदैव प्रयत्नशील आहे.भविष्यात अनेक उपक्रम राबविण्यात येतील अशी ग्वाही दिली.
यावेळी जयश्री कदम यांच घर पडलं त्याला मंडळा कडून आर्थिक मदत देण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी करण्या करीता
ग्रामपंचायत सदस्य , कर्मचारी, सुरेन्द्र सकपाळ,बाबू सकपाळ, प्रविंण घाडीगांवकर,छाया साटम , संतोषी सावंत यांनी विशेष प्रयत्न केेले.