पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त फोंडाघाट विभागातील 2 हजार विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप

भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे मित्रमंडळ व फोंडाघाट भाजपाचे आयोजन

मत्स्योद्योग व बंदर विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त फोंडाघाट विभागातील 2 हजार विद्यार्थ्यांना भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे मित्र मंडळ व फोंडाघाट भाजपाच्या वतीने 23 जून रोजी मोफत वह्यावाटप करण्यात येणार आहे.
फोंडाघाट विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!