पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथे गुणवंत विद्यार्थांचा सत्कार संपन्न

शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव यांच्या यश कॉम्प्युटर अकॅडमी च्या वतीने आयोजन

कणकवली पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार

महाराष्ट्राचे मत्स्योद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव यांच्या यश कॉम्प्युटर अकॅडमी च्या वतीने खारेपाटण तरळे विभागातील इयत्ता दहावी व बारावी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार समारंभ शनिवारी 21 जून रोजी सकाळी दहा वाजता शेठ न म विद्यालय येथे पार पडला
यश अकॅडमी दरवर्षी हा उपक्रम आयोजित करते संस्थेचे हे 23 वे वर्ष असून खारेपाटण विभागातील खारेपाटण ,शेरपे, वारगाव हायस्कूल तसेच देवगड कोरले धालवली हायस्कूल येथील दहावीत प्रथम आलेल्या व खारेपाटण प्र ल पाटील ज्युनिअर कॉलेज मधील आर्ट्स कॉमर्स व सायन्स, +२ मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार गौरवचिन्ह व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कणकवली पोलिस निरीक्षक श्री जगताप साहेब, संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे, मुख्याध्यापक श्री सानप सर, विभाग प्रमुख श्री गुरू शिंदे, संचालक योगेश गोडवे, शहर प्रमुख श्री सुहास राऊत पर्यवेक्षक श्री राऊत सर, करुणकर सर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री जगताप सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा साठी कठोर मेहनत घेऊन प्रशासकीय अधिकारी बना असे आवाहन केले. दहावी बारावी नंतरच्या करिअर दिशा या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन केलं
कार्यक्रमाला विभागातील विद्यार्थ्यांनी व पालक मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमच सूत्रसंचालन श्री वरुणकर सर तर प्रास्ताविक आणि आभार श्री मंगेश गुरव यांनी मानले.

error: Content is protected !!