गावातील रस्ता खचल्याने तोरसोळे ग्रामस्थ आक्रमक

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख रवींद्र जोगल यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यां सोबत केली खचलेल्या रस्त्याची पाहणी

सुशांत नाईक, रवींद्र जोगल यांच्यासह ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

देवगड तालुक्यातील तोरसोळे गावच्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरु आहे. रस्त्याचे काम ८०% पूर्ण झाले असून उर्वरित २०% काम पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहे. पूर्ण झालेल्या रस्ता खचल्याने तोरसोळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख रवींद्र जोगल यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी मोंडकर यांच्यासमवेत खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख रवींद्र जोगल यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. या रस्त्यावरून अवजड वाहतूक जास्त होत असल्याकारणाने हा रस्ता चांगला होण्याची मागणी येथील ग्रामस्थांची आहे. बऱ्याच वर्षानंतर या रस्त्याचे काम होत असल्याने ते काम चांगले व्हावे अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.तसेच खड्डे पडलेल्या ठिकाणी त्याची डागडुजी करून देणे हे सदर ठेकेदाराचे काम आहे. रस्त्यालगत वाढलेली झाडी देखील तोडावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे. सुशांत नाईक व रवींद्र जोगल यांनी अधिकाऱ्यांना खडसावले ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण झाल्याचं पाहिजेत. तसेच ग्रामस्थांचे झालेले नुकसान देखील तुम्ही दिले पाहिजे. यावर अधिकारी मोंडकर यांनी या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले तसेच या रस्त्यावरून होत असलेली अवजड वाहतूक बंद करण्याचे पत्र देतो असे आश्वासन यावेळी दिले. ग्रामस्थांचा मागण्या पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईल ने उत्तर देऊ असे नाईक यावेळी बोलले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख रवींद्र जोगल,उपतालुका प्रमुख दादा सावंत, युवासेना उपतालुका प्रमुख सचिन पवार,तोरसोळे उपसरपंच सुहास पवार, सदस्या शुभ्रा मेस्त्री,योगिता सावंत, उपशाखा प्रमुख अजित पवार,राजू परब, विजय पवार, सचिन पवार, राज लाड,सुहास चव्हाण,नामदेव राणे,दिनेश पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!