कणकवली बाजारपेठेत एका जोडप्याकडून दोघांच्या पर्स लंपास

एका वृद्ध महिलेच्या मुलीने सतर्कता दाखवत चोरट्या महिलेला पकडून पर्स घेतली काढून
पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्याकडून तात्काळ कणकवलीत पोलीस पथक चोरट्यांच्या मागावर
मंगळवारच्या आठवडा बाजार दिवशी आज दुपारी 11.30 वा. दरम्यान कणकवली शहरात एका जोडप्याने हातचलाखी करत दोघांच्या पर्स मधील पैसे लंपास केले. मात्र यातील पर्स मधील पैसे चोरीला गेलेल्या एका वृद्ध महिलेच्या सोबत असलेल्या तिच्या मुलीने तात्काळ ही बाब निदर्शनास येताच तेथील असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून बाजारपेठेतच ज्या दिशेने चोरटी महिला गेली त्या दिशेने तिचा शोध घेतला असता ढालकाठी दरम्यान ही महिला व एक तिच्यासोबत छोटे मुल आणि एक पुरुष अशी तिघेजण तेथे सापडली. त्या महिलेच्या मुलीने तिला पकडत आक्रमक भूमिका घेतली व तिच्या ताब्यात असलेली पर्स काढून घेतली. मात्र या दरम्यान तिच्यासोबत असलेला तो पुरुष तेथे येत त्या चोरट्या महिलेस व त्या दोघांनी तिथून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी तात्काळ सूत्रे हलवत कणकवली पोलिसांचे एक पथक राजेश पाटील, राजेंद्र नानचे, दिगंबर घाडीगावकर यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी कणकवली शहरात या जोडप्याच्या शोधासाठी पाठवले. कणकवली शहरात या चोरट्या जोडप्याचा पोलीस शोध घेत असून शहरात आज आठवडा बाजाराची संधी साधून दोन महिलांची पाकिटे या जोडप्याने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत अधिकृत पोलिसात कोणतीही तक्रार नाही. दरम्यान दुसऱ्या एका महिलेच्या पर्समधून या जोडप्याने हातचलाखी करून 3 हजार रुपये लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत अधिकृत तक्रार दाखल नाही.