पालकमंत्री नितेश राणेंच्या आदेशानंतर रेल्वे स्टेशन वरील कोसळलेल्या छताचा भाग केला सुस्थितीत

आज संध्याकाळी कणकवली रेल्वे स्टेशनवर घडली होती घटना
उर्वरित सिलिंग चे रि चेकिंग करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना
कणकवली रेल्वे स्टेशन बाहेरील भागातील छताच्या सिलिंग चा काही भाग कोसळल्याची घटना आज घडल्यानंतर याबाबतची माहिती मिळतात सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य उद्योगमंत्री नितेश राणे यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम तातडीने मार्गी लावण्याचे तसेच या सिलिंगच्या उर्वरित भागाच्या री चेकींगचे आदेश दिले. त्यानंतर हे काम तातडीने हाती घेत पूर्ण करण्यात आले. दरम्यान आज शनिवारी दुपारी कणकवली रेल्वे स्टेशन बाहेरिल भागात छताच्या सिलिंग ची प्लेट खाली लोंबकळत राहिली. सुदैवाने यात ती प्लेट कुनावर पडली नसल्याने अपघात टाळला. या घटने नंतर शिवसेना ठाकरे गटाने तेथे भेट देत कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही घटना घडल्यानंतर याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांना माहिती मिळतात त्याने सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्याना आदेश देत सीलिंग सुस्थितीत आणण्या बाबत आदेश दिले व पालकमंत्र्यांच्या आदेशाने काही वेळातच हे काम मार्गी लागले. तसेच उर्वरित सिलिंगचे देखील रि चेकिंग करण्याबाबत सूचना पालकमंत्र्यांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
दिगंबर वालावलकर/ कणकवली