शिवसेना ठाकरे गटाच्या दणक्या नंतर वैद्यकीय सह संचालक 9 जून रोजी सिंधुदुर्गात

वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनेक प्रश्नाबाबत वेधले होते शिवसेना शिष्टमंडळाने लक्ष
वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन कडून परिपत्रक
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्यक्ष रेकॉर्डवर असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असून या प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने करत या बाबत आरोग्य सहसंचालकांना जिल्ह्यात बोलावून बैठक लावा अन्यथा याबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. दरम्यान या आरोपा नंतर याची तात्काळ दखल घेत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनंत डवंगे यांनी यासंदर्भात एक कार्यालयीन परिपत्रक काढले असून त्यानुसार वैद्यकीय सहसंचालक 9 जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या भेट देणार असून यावेळी ते वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे यावेळी सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी अध्यापक प्रशासकीय अधिकारी निवासी डॉक्टर नियमित व कंत्राटी कर्मचारी यांनी 9 जून रोजी वेळेत आपल्या कर्तव्यावर हजर राहावे. अनधिकृतपणे गैरहजर राहिल्यास आपल्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर अनंत डवंगे यांनी या परिपत्रका द्वारे दिला आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली