नगरपंचायत ने खोदलेल्या खड्ड्यामध्ये टेम्पो रुतल्याने बाजारपेठेत वाहतूक कोंडी

शनिवारी सकाळची कणकवली बाजारपेठे मधील घटना

नळ योजना पाईपलाईन दुरुस्ती झाल्यानंतर खडी टाकून खड्डे पूर्ववत करण्याची मागणी

कणकवली नगरपंचायत ने कणकवली शहरातील बाजारपेठेमध्ये नळ योजना पाईपलाईन दुरुस्ती करताना रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यांमध्ये आज शनिवारी सकाळी टेम्पो रुतल्याने काही काळ बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. दरम्यान शिरसाट कापड दुकानासमोरील खड्ड्यांमध्ये अडकलेला हा टेम्पो नागरिकांनी धक्का देऊन खड्ड्यातून बाहेर काढला. मात्र कणकवली नगरपंचायतने गेले काही दिवस बाजारपेठेत नळ योजना दुरुस्तीसाठी खोदाई केलेले मातीने बुजवल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच दुकानांच्या समोर खड्डे खोदून ठेवल्याने दुकानदारांनाही या खड्ड्यांचा त्रास होत आहे. याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी शहरवासीयांमधून व शहरातील बाजारपेठेतील दुकानदारांमधून केली जात आहे.

error: Content is protected !!