सिंधुदुर्गातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढविणारा विकास करण्यासाठी सरकारचा पुढाकार

मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन
गुणवत्त अधिकारी व दहावी बारावी गुणवंतांचा लॅपटॉप देऊन झाला सत्कार सोहळा
सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या महत्वाच्या टप्प्यावर आहे. जिल्ह्यातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढविणारा विकास करण्यासाठी भाजप सरकारचा पुढाकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृष्टी असलेले नेते असून जनतेसाठी आवश्यक असलेली चांगली कामे आता होऊ लागली आहेत. शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात काही अधिकाऱ्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहावी बारावी विद्यार्थ्यांची गुणवत्ता निकालातून दिसली. दहावी बारावी मध्ये पैकीच्या पैकी म्हणजे 100% गुण मिळवणारे बुद्धिवान विद्यार्थी आहेत. त्यांचे कौतुक करताना त्यांचा सत्कार करताना आपल्याला आनंद होत आहे. असे गौरवोद्गार राज्याचे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.
मुख्यमंत्री शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव व दहावी बारावी परीक्षेत प्रथम व गुणवत्ता मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आपण जिल्हाधिकारी यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे, अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी शिंपी मॅडम आपत्ती व्यवस्थापन प्रमुख राजश्री सामंत यांनी केले.
लाल मातीतील रस्त्यांचा त्यावेळी असलेला सिंधुदुर्ग व आताचा गावागावात वाडी वस्त्यांवर डांबरीकरण रस्त्यांचे जाळे असलेला सिंधुदुर्ग पाहताना आनंद होतो. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी या जिल्ह्यात शिक्षणाला व विकासाला महत्व दिले. या जिल्ह्यात दर्जेदार शिक्षण तेवढाच दर्जेदार विकास हे त्यांचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. चांगले काम करणारे अधिकारी व या जिल्ह्यातील बुद्धिवान गुणवंत विद्यार्थी ही या जिल्ह्याची विकासाची दोन चाके आहेत. पुढच्या काळात या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या जिल्ह्यात नोकरी किंवा व्यवसाय निर्माण होईल एवढा या जिल्ह्याचा विकास करू असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमात काही विभागातील अधिकाऱ्यांनी चांगले काम केले आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक आहेच. जिल्ह्याच्या विकास कामात अशा चांगल्या अधिकाऱ्यांसोबत कायम पाठीशी राहू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढील 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमात विभागात प्रथम स्थानी यावे एवढे काम करावे अशी अपेक्षाही मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली.
अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी आपल्या मनोगतात खासदार नारायण राणे यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले. मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील दहावी बारावी गुणवंत बुद्धिवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे. या जिल्ह्याचे खासदार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कडून आलेल्या लॅपटॉप ची भेट देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरेल व या जिल्ह्याची गुणवत्ता व या जिल्ह्याचा विकास वाढण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर म्हणाले येवा कोकण आपलाच असा असे मी ऐकले होते. या जिल्ह्यात आल्यानंतर हा जिल्हा आपलाच वाटला. लोकप्रतिनिधी व जनता आपली वाटली या जिल्ह्यातून परत जाताना हा जिल्हा आपलाच वाटेल असे काम व या जिल्ह्याचे सेवा आपण करू असे ते म्हणाले.
यावेळी दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमात चांगले काम केलेल्या व कोकण विभाग स्तरावर नंबर मिळवलेल्या अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा सत्कार मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाला.