कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाज गुणवंत गौरव सोहळा 13 जुलै रोजी

समाज बांधवातील गुणवंत विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ, कणकवली यांच्या वतीने 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन रविवार, 13 जुलै रोजी रोजी दुपारी 3 वाजता पूर्णानंद भवन फोंडाघाट कणकवली येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात इयत्ता 10 वी मध्ये 80 टक्के व त्यापेक्षा अधिक, बारावी मध्ये 70% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या तसेच पदवी/पदविका/पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये 60% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सर्व स्पर्धात्मक एमटीएस एनटीएस बीडीएस ऑलंपियाड आदी स्पर्धा परीक्षांमध्ये एक ते तीन क्रमांक मिळवलेल्या तसेच कला व क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत 210 पेक्षा जास्त गुण मिळवत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देखील गौरव करण्यात येणार आहे. यासोबत सामाजिक सांस्कृतिक कृषी व राजकीय क्षेत्रात प्राविण्य व पुरस्कार मिळवणाऱ्या समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. या गुणगौरव सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांनी 15 जून 2025 पर्यंत आपली माहिती गुणपत्रिकेची प्रत व आवश्यक कागदपत्रे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे जमा करावी. संपर्कासाठी: यामध्ये हर्षल उर्फ राजूशेठ गवाणकर 9422584900, राजेंद्र आजगावकर 9421266464, रामचंद्र उर्फ बाळा बावकर 94 21 32 27 15, अरुण सामंत 9423300002, प्रथमेश महाजन 96 73 21 53 51 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!