विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर

संशयितांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
विवाहीतेला वारंवार अश्लिल फोन करून रात्रीच्यावेळी तीच्या खोलीवर जात अश्लिल वर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी सिद्धेश बाळू खरात, प्रमोद प्रकाश कोकरे यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामिन मंजूर केला. संशयितांच्यातीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
एका गावातील विवाहीत महिलेला तीचा वारंवार पाठलाग करून व तीचा मोबाईल नंबर मिळवून तीला वेळी अवेळी अश्लिल फोन केले. तसेच रात्रीच्यावेळी ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत राहत्या घरी जात अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी विवाहीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार तीघांवर भारतिय न्याय संहिता कलम ७४, ७५, ७८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत संशयितांच्यावतीने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता सुनावणीअंती प्रत्येकी ५० हजार रुपयांचा जामिन मंजूर करताना पुराव्यात ढवळाढवळ करू नये, फिर्यादीशी संपर्क साधू नये, आदी अटी घालण्यात आल्या आहेत.