खारेपाटण येथे २३ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन

स्वतःचा प्राण तळहातावर घेऊन शत्रूशी लढणाऱ्या तसेच वीरगती प्राप्त करणाऱ्या, देशातील नागरिकांना शत्रूंपासून सुरक्षा आणि अभय देऊन सुखाचे घास खाऊ देणाऱ्या त्रिदलातील सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या शौर्यकर्तृत्वाला प्रेरणा देण्यासाठी आणि पाकिस्तानवरील भारताच्या विजयाचा सन्मान करण्यासाठी भव्यदिव्य तिरंगा रॅलीचे खारेपाटण येथे आयोजन करण्यात आले आहे.दहशत वादाच्या विरोधात शोर्य व प्राणपणाने लढून आपल्या देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या व वेळप्रसंगी स्वतःच्या जीवाचे बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खारेपाटण येथे दी.२३ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व खारेपाटण माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी दिली.
खारेपाटण हायस्कूल ते खारेपाटण एस टी बस स्थानका पर्यंत काढण्यात येणाऱ्या या तिरंगा रॅलीत शालेय विद्यार्थी,शेतकरी, व्यवसायिक,शिक्षक,डॉक्टर,वकील, इंजिनिअर,इत्यादी सह सर्व देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील श्री रमाकांत राऊत यांनी केले आहे.