ऑपरेशन सिंदूर च्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर तळेरे येथे भव्य तिरंगा रॅली संपन्न

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या उत्तरादाखल ऑपरेशन सिंदूरने मिळवलेल्या विजयाच्या सन्मानार्थ तसेच या विजयासाठी प्राण तळहातावर घेऊन लढणाऱ्या त्रिदलातील, विशेषतः वायुदलातील सैनिकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, युद्धात स्वतःचे प्राण समर्पण करून अमर झालेल्या वीरांप्रति आणि पहलगाम हल्ल्यात भारतीय म्हणून प्राण गमावलेले पर्यटक या सर्वप्रथम कृतज्ञता अभिव्यक्त करण्यासाठी तळेरे येथे ही तिरंगा मेळयात्रा काढण्यात आली. स्वतःचा प्राण तळहातावर घेऊन शत्रूशी लढणाऱ्या तसेच वीरगती प्राप्त करणाऱ्या, देशातील नागरिकांना शत्रूंपासून सुरक्षा आणि अभय देऊन सुखाचे घास खाऊ देणाऱ्या त्रिदलातील सैनिकांप्रति कृतज्ञता अभिव्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या शौर्यकर्तृत्वाला प्रेरणा देण्यासाठी आणि पाकिस्तानवरील भारताच्या विजयाचा सन्मान करण्यासाठी भव्यदिव्य तिरंगा रॅलीचे तळेरे येथे आयोजन करण्यात आले होते.
या तिरंगा रॅलीचे तळेरे एसटी स्थानकापासून आरंभ होऊन पूर्ण बाजारपेठेत फिरून पुन्हा एसटी स्थानक येथे विसर्जन झाले. ‘भारतीय लष्कराचा विजय असो!’, ‘जय जवान जय किसान!’ या जल्लोषपूर्ण घोषणांचा नाद तळेरे येथे निनादला.
या तिरंगी यात्रेत नेतृत्व करणारे भाजपा मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, महिला मंडलाध्यक्ष हर्षदा वाळके, कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, माजी जि.प.सदस्य संजय देसाई, डाॅ. मिलिंद कुलकर्णी,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आण्णा खाडये, तळेरेचे सरपंच हनुमंत तळेकर, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय दुदवडकर, उपाध्यक्ष गुरु सावंत, सचिन राणे, संजय पाताडे, पंढरीनाथ वायंगणकर, सूर्यकांत भालेकर, तळेरेच्या माजी सरपंच साक्षी सुर्वे,माजी उपसरपंच शैलेश सुर्वे, कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे,ओझरम उपसरपंच प्रशांत राणे, दिपक नांदलसकर, दिनेश मुद्रस, शशांक तळेकर, राजु जठार, चंद्रकांत तळेकर, देवकी तळेकर, भाजपा शक्ती केंद्र प्रमुख -सूर्यकांत भालेकर,दळवी कॉलेजचे विद्यार्थी, तळेरे विद्यालयाचे एन.सी.सी. विभागाचे विद्यार्थी व तळेरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.