आचरा पारवाडी कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने केला विषप्रयोग

प्रकल्पातील 18 लाख किंमतीची कोळंबी झाली गतप्राण

अज्ञाता विरोधात आचरा पोलिसात गुन्हा दाखल

आचरा पारवाडी डोंगरेवाडी लगत चालू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात सुमारे १८ लाख किंमतीची कोळंबी गतप्राण झाली आहे. याबाबतची फिर्याद आचरा पोलीस ठाण्यात प्रकल्पाचे मॅनेजिंग डायरेक्टर अपूर्व अंत्तोन फर्नाडीस, राहणार धुरीवाडा मालवण, यांनी आचरा ठाण्यात दिली असून आचरा पोलिसांनी अज्ञाता विरोधात भा. न्या. सं. 2023 चे कलम 286,324(5) प्रमाणे विषारी पदार्थ टाकून मानवी जीविकास दुखापत उत्पन्न होईल अशी कृती करून कोळंबी प्रकल्पातील कोळंबीचे नुकसान करणे प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १३ मे रोजी रात्रौ 11.00 ते 12.00
दरम्यान घडली असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. तक्रारी नंतर गुरुवारी जिल्हा मुख्यालयातून फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली होती या टीमने पाहणी केली असून गतप्राण झालेल्या कोलंबीचे व विषारी पदार्थाचे घटनास्थळी सापडलेले नमुने ताब्यात घेतले आहेत.

आचरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आचरा पारवाडी डोंगरेवाडी येथील कोलंबी प्रकल्पात विषप्रयोग झाल्याचे दिसून आल्यावर प्रकल्पाचे मॅनेजिंग डायरेक्टर अपूर्व अंत्तोन फर्नाडीस यांनी आचरा ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की आचरा डोंगरेवाडी येथे एकूण ३० एकर जमिन में ट्रायटोन मरीनेक्स प्रायव्हेट लिमिटेड या नांवे असून त्या कंपनीचा मी मैनेजिंग डीरेक्टर आहे. सदर १५ एकर चिंगुळ प्रकल्पामध्ये आठ तलावे आहेत. प्रत्येक तलाव हे एक ते सव्वा एकर मध्ये आहे. सध्यस्थितीत चार तलावामध्ये चिंगुळ प्रकल्प चालु आहे. त्याला संपूर्ण जाळीचे कम्पाऊंड आहे. सदर चिंगुळ प्रकल्पाच्या देखरेखी करीता सहा कामगार आहेत. मी आणि माझे वडील आठवडयातुन दोनवेळा सदर प्रकल्पावर येवुन जावून असतो. सदरची चिगुळ प्रकल्प शेती ही आम्ही माहे ऑक्टोंबर ते में अखेर पर्यंत करतो. त्यानंतर पाऊसामुळे आम्ही सदरची शेती बंद ठेवतो. चालू वर्षी आम्ही सदर शेतीमध्ये माहे जानेवारी २०२५ मध्ये चिंगुळचे लहान लहान पिल्ले चेन्नई मधून आणून आमचे चिंगुळ प्रकल्पातील डोंगरेवाडी पारवाडी खाडीबाजूकडील चार तलावामध्ये सोडलेले होते. आम्ही में २०२५ च्या पहिल्या आठवडयात सुमारे ४०० किलो पूर्ण वाढ झालेली कोळंबी काढलेली होती उर्वरीत कोळंबी आम्ही मे महिन्याच्या च्या अखेरीस हॉर्वसटिंग करणार होतो. दिनांक 13 मे रोजी ०७.०० वा. चे दरम्याने चार दिवसपाळीचे कामगार नेहमीप्रमाणे कोळंबीला खाद्य देवून घरी निघून गेले. त्यावेळी रात्रपाळीस असणारे कामगार हे कोळंबी प्रकल्पावर उपस्थित होते. त्यानंतर रात्री ११.०० वा.चे मानाने प्रकल्पामध्ये लावलेले एरियेटर हजर असलेल्या कामगाराने बंद केले. त्यानंतर ते नेहमीप्रमाणे कोळंबी प्रकल्पावर फेरी मारण्यासाठी गेले व त्यानंतर रात्री १२.०० वा.चे. मानाने प्रकल्पावरील एरियेटर पुन्हा चालू केले त्यावेळी आचरा पारवाडीच्या दिशेने असलेले दोन तलावातील कोळंबी पाण्यावर तरंगू लागल्याचे त्यांनी पाहीले म्हणून त्यांनी सुपरवायझरला परसनजीत मचरा यास जावून कळविले. कोळंबीच्या तलावाजवळ येवून पहाणी केल्यानंतर त्यांना असे वाटले की ऑक्सिजन लेव्हल कमी झाली असावी म्हणून खाडीतील पाण्याचा पंप चालू केला. परंतु तलावातील कोळंबी मरण्यास सुरुवात झाली अणि सदर तलावात केमिकलसारखा कसला तरी वास येवु लागला. सदरची घटना मला सुपर वायझरने दिनांक १४ रोजी रात्री ०२.०० वाजता फोनवरून कळविली म्हणून मी त्याला लागलीच कोळंबीची हॉर्वेस्टिंग करण्यास सांगितले व मी मुंबई येथे कामास गेलो असल्याने लागलीच मुंबईवरून आचरा पारवाडी येथे कोळंबी प्रकल्पावर दुपारी १२.०० वा. दरम्यान पोहचलो. हॉर्वेस्टिगसाठी आलेल्यापैकी एका कामगाराला एका तलावात केमिकलने भरलेली बाटली मिळाली तलावाचे आजुबाजुला पाहणी करत असताना तलावाच्या तळाला पिठाचे गोळे दिसले व त्याला कसलातरी केमिकलसारखा वास येत होता.
दिनांक १३/०५/२०२५ रोजी रात्री ११.०० ते १२.०० वा.चे. मुदतीत कोणीतरी अज्ञात इसमाने आचरा पारवाडी येथील कोळंबी प्रकल्पातील दोन तलावात कोणते तरी विषारी पदार्थ टाकून मानवी जिवीतास धोका उत्पन्न होईल अशी कृती केल्याचे दिसून येते. त्यात माझ्या दोन तलावातील कोळंबी गतप्राण होऊन कोळंबी प्रकल्पातील सुमारे ४००० किलो वजनाचे अंदाजे १८,००,०००/- रूपये (१८ लाख) किमतीचे नुकसान केले असल्याने सदर अज्ञात इसमाविरूध्द तक्रार देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान आचरा पोलीसांनी तात्काळ पाहणी करून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दुपारी ओरोस येथून फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली होती. टीमचे कमलेश सोनावणे, तनुजा रावले, आचरा पोलीस सहायक पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी देसाई, बाळू कांबळे, सुशांत पुरळकर, स्वाती आचरेकर तपासात सहभागी झाले होते.

error: Content is protected !!