ताज हॉटेल इंडस्ट्रीज सिंधुदुर्गात गुंतवणुकीस उत्सुक – मंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न सुरू

मंत्रालयात ताज ग्रुपच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
जगभरात नावाजलेल्या ताज हॉटेल इंडस्ट्रीज ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न सुरू आहेत. पर्यटनदृष्ट्या समृद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास अधिक गतीने व्हावा, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ताज ग्रुपचा सहभाग महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
याच उद्देशाने मुंबईतील मंत्रालयात नुकतीच पालकमंत्री नितेश राणे यांनी ताज हॉटेल्स अँड हॉस्पिटॅलिटी चे व्यवस्थापकीय संचालक पुनीत चटवाल आणि कार्यकारी उपाध्यक्ष बीजल देसाई यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताज हॉटेल्सचा प्रकल्प उभारण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
“सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने आणखी विकसित करायचं असल्यास, ताज ग्रुप सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉटेल ब्रँडचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला गती देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू,” असं आश्वासन यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलं.
बैठकीत सिंधुदुर्गमधील विविध पर्यटन स्थळे, त्यांचा संभाव्य विकास, स्थानिक पातळीवरील सुविधा आणि रोजगार निर्मिती यावर सविस्तर चर्चा झाली. ताज ग्रुपने सिंधुदुर्गात प्रकल्प राबविल्यास, त्याचा संपूर्ण कोकण परिसरावर सकारात्मक परिणाम होईल, असेही राणे यांनी नमूद केले.