कणकवलीत 16 मे रोजी तिरंगा यात्रा

पालकमंत्री नितेश राणे करणार तिरंगा यात्रेचे नेतृत्व
आपल्या भारत देशासाठी आणि भारत देशा च्या सुरक्षिततेसाठी लढा देणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी दिनांक 16 मे रोजी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.
या तिरंगा यात्रेचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे साहेब करणार आहेत.
तरी कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, शिक्षक वर्ग, रोटरी सदस्य , डॉक्टर, वकील, शाळेतील विद्यार्थी यांनी यावेळी उपस्थित राहायचं आहे.
ही यात्रा सायंकाळी 4.30 वाजता पटकी देवी मार्गे निघून तहसीलदार ऑफिस कडे रवाना होईल. अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.