मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणारे महसूल कर्मचारी विठ्ठल कंठाळे व संदीप हांगे यांना निलंबित करा

माजी आमदार परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

परवानगी न घेता नियमबाह्यपणे मुख्यालय सोडल्याचा आरोप

विठ्ठल वैजिनाथ कंठाळे आणि श्री. संदीप पांडुरंग हांगे हे दोन्ही मालवण तालुक्यात महसूल यंत्रणेमध्ये तहसिल मालवण यांच्या अंतर्गत काम करत आहे. त्यांचे मुख्यालय मालवण आहे.
मुख्यालय मालवण असताना ११ मे २०२५ रोजी मालवण मुख्यालय सोडण्यासाठी कोणाचीही परवानगी न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यातकरीत मालवण मुख्यालय सोडून ते कणकवली येथे आले होते. मुख्यालय सोडताना कुणाचीही परवानगी न घेतल्याने शिस्त व अपील नियम १९७९ याप्रमाणे त्याचबरोबर प्रशासकीय कामकाजातील नियमावली प्रमाणे मुख्यालय परवानगी न घेता जिल्हाधिकारी व वरिष्ठ पदाधिकारी मा. ना. मुख्यमंत्र्यांसोबत असताना असा सत्कार मुख्यालय सोडून येऊन करणे हे प्रशासकीय यंत्रणेमध्ये चुकीचा पायांडा आहे. अशी तक्रार माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे,
याबाबत माजी आमदार वैभव नाईक यांनी यापूर्वी हे दोघेही लाचखोरी मध्ये असल्याने लाचखोरीच्या गुन्हाबाबत उल्लेख करून “लाचखोर तलाठ्‌यांनी मुख्यमंत्र्यांचा केला सत्कार” या मथळ्याखाली बातमी सोशल मीडियावर आल्यानंतर १२ मे २०२५ रोजी सर्व वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना बातमी छापू नये व आपला खुलासा लेखी स्वरुपात विठ्ठल वैजिनाथ कंठाळे आणि संदीप पांडुरंग हांगे यांनी आपल्या भ्रमणध्वनीचा नंबर देऊन स्वतःची सही करून पत्र सर्व दैनिकांना दिलेले आहे. व सर्व दैनिकांचे प्रतिनिधी यांनाही फोन केलेला आहे.
कोणताही खुलासा वृत्तपत्राला देताना शासनाची नियमावली व शासन निर्णय पत्र क्र. मुसका-२०१६/१९२५१२/का.१ दि. २२ मार्च २०१६. २ नंबरवर केलेला आहे. त्या नियमाप्रमाणे कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक व ग्रामस्थ यांनी केलेली टिका, टिपणी, विरोधात बातमी दिल्यानंतर त्यांचा खुलासा करताना ४८ तासात वरिष्ठांची परवानगी घेऊन तो खुलासा जिल्हा माहिती व प्रसारण अधिकारी यांच्या माध्यमातून खुलासा करायचा असताना परस्पर स्वतः कोणतीही परवानगी न घेता खुलासा स्वतः प्रत्येक दैनिकांना दिलेला आहे. ही बाब प्रशासकीय यंत्रणेत प्रशासनाच्या आदेशा विरोधात आहेत.
तरी वरील दोघांनी मुख्यालय सोडण्याची परवानगी न घेता मुख्यालय सोडल्याबाबत व शासन निर्णयप्रमाणे वरिष्ठांची परवानगी न घेता आपलेल्या विरोधात आलेले बातमीचा खुलासा स्वतःच्या सहिने परस्पर सर्व दैनिकांच्या प्रतिनिधींना दिलेला आहे. व त्यांच्याविरु‌द्ध अनेक भ्रष्टाचारांच्या तक्रारी आहेत. याबाबत त्यांच्यावर तालडीने निलंबनाची कारवाई करावी करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!