जनता विद्यामंदिर त्रिंबक दहावीचा निकाल 100टक्के

जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेचा फेब्रुवारी 2025 च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला.
प्रशाले मधून एकूण 22 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते, ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले असून, कुमारी कोमल संतोष अपराज हिने 461 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कुमारी शर्वरी प्रशांत परब हिने 460 गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे, तर कुमारी केतकी प्रसाद घाडीगावकर हिने 451 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे, तसेच कुमारी प्रांजल बाळकृष्ण त्रिंबककर हिने 450 गुण मिळून चतुर्थ क्रमांक पटकाविला आहे आणि कुमारी हर्षदा प्रसाद घाडीगावकर हिने 448 गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकाविला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबकचे अध्यक्ष श्री सुरेंद्र सकपाळ, उपाध्यक्ष श्री अशोक बागवे, कार्यवाह श्री अरविंद घाडी, तसेच सर्व कार्यकारणी तसेच मुख्याध्यापक श्री. प्रवीण घाडीगांवकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.