खारेपाटण हायस्कुल 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल 100%

आयुष प्रशांत मांगले 91.40% गुण मिळवून हायस्कुल मध्ये प्रथम
द्वितीय क्रमांक अवधूत रवींद्र गोखले 89.60% ; तर तृतीय क्रमांक श्रावणी श्रीकृष्ण बाणे 86.80%
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक/उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एस एस सी बोर्ड परीक्षा मार्च – २०२५ निकाल आज जाहीर झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेठ न.म. विद्यालय खारेपाटण या हायस्कूलचा निकाल १०० % लागला असून या शाळेचा विद्यार्थी कु.आयुष प्रशांत मांगले याने ९१.४० % गुण मिळवीत खारेपाटण हायस्कूल मध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न.म. विद्यालय खारेपाटण या हायस्कूल ने आपल्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून १० वी मार्च २०२५ बोर्ड परीक्षेत कु.आयुष प्रशांत मांगले याने ९१.४० टक्के गुण मिळवीत प्रथम व कु.अवधूत रवींद्र गोखले या विद्यार्थ्याने ८९.६० टक्के गुण मिळवीत हायस्कूल मध्ये द्वितीय येण्याचा मान पटकावला आहे.तर कु.श्रावणी श्रीकृष्ण बाणे या विद्यार्थिनीने ८६.८०.% गुण मिळवीत हायस्कूल मध्ये तृतीय येण्याचा मान पटकावला आहे.
खारेपाटण हायस्कूल मधून दहावी बोर्ड परीक्षेला यंदा एकूण १०६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सर्व १०६ विद्यार्थी पास झाले. त्यामुळे शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.शाळेच्या १०० टक्के यशाची परंपरा शालेय विद्यार्थ्यांनी कायम राखल्या बद्दल खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे व सचिव श्री महेश कोळसुलकर हायस्कूल चे मुख्यद्यापक श्री संजय सानप पर्यवेक्षक श्री संतोष राऊत, तसेच संचालक मंडल सदस्य तसेच शिक्षककेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .