किर्लोस कृषि विज्ञान केंद्रात मधमाशी पालन प्रशिक्षणाचे आयोजन परागी भवनासाठी मधमाशी पालन महत्त्वाचे. मधमाशी पालन एक उत्कृष्ट शेतीपुरक जोडधंदा. पीक उत्पादन वाढीसाठी करा मधमाशी पालन.                                कृषी विज्ञान केंद्र आयोजित प्रशिक्षण शिबिरात बाळकृष्ण गावडे यांचे आवाहन

कृषी विज्ञान केंद्राद्वारे मधुमक्षिका पालन विषयाचे पाच दिवस कालावधीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान (NBHM) अंतर्गत कृषी विभागाच्या सहकार्याने सदर प्रशिक्षण किर्लोस येथ आयोजित केले.   सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री प्रदीप सावंत यांच्या हस्ते प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला व त्यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.  केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांनी या प्रशिक्षणाचे आयोजन केले. त्यानी प्रशिक्षणार्थीना तांत्रिक व प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. ते म्हणाले मधमाशी हा सामाजिक कीटक आहे. फलधारणेसाठी परागीभवन महत्त्वाचे असते.  परागीभवनाचे मोठे काम मधमाशा करत असतात. मध उत्पादनाबरोबरच शेतीतील उत्पादन वाढीसाठी मधमाशीपालन हा एक महत्त्वाचा पूरक व्यवसाय आहे. रोजगार निर्मितीसाठी या व्यवसायात वाव असून शेतकऱ्यांनी हा व्यवसाय शेती पूरक जोड धंदा म्हणून करणे फायदेशीर ठरेल असे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे म्हणाले. यापुढे ते म्हणाले की  मधुमक्षिका पालनाचे अनेक फायदे आहेत. या व्यवसायाद्वारे शुद्ध मधाचे उत्पादन व शुद्ध  मेणाचे उत्पादन करता येते. औषध आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये मध आणि मेणाचा उपयोग होतो. परागीभवनाद्वारे पिकांच्या उत्पादनात भरीव वाढ होते. तसेच निसर्गाचे संतुलन व संवर्धन होते असे ते म्हणाले.
       प्रशिक्षणामध्ये मधुमक्षिका पालन तंत्रज्ञानाची विविध तज्ञांद्वारे माहिती देण्यात आली. मध पेटी संवर्धनाची प्रात्यक्षिकाससह माहिती मधमाशी पालक शेतकरी श्री नारायण चेंदवणकर यांनी दिली. या प्रशिक्षणास खादी ग्रामोद्योग आयोगाचे मध पर्यवेक्षक चाटे यांनी मधुमक्षिका पालन व मध निर्मितीच्या योजनांची माहिती दिली. दूरदृष्टी प्रणाली द्वारे पालघरचे शास्त्रज्ञ श्री उत्तम सहाने व केंद्रीय मधमाशी संशोधन  व प्रशिक्षण संस्था पुणे येथील श्री राहुल काळे व कृषी विज्ञान केंद्र नाशिकचे श्री ऋषिकेश पवार यांनी मार्गदर्शन केले.   जिल्ह्यातील 21 प्रशिक्षणार्थीनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, डॉ.विलास सावंत, विकास धामापूरकर, डॉ. केशव देसाई, विवेक सावंत भोसले, सुमेधा तावडे संशोधन सहाय्यक सिद्धेश गावकर, अधिकारी मंगेश पालव, नरेंद्र सावंत व कर्मचारी झिलू घाडीगावकर, मिलिंद घाडीगावकर, अरुण पालव व सुधीर पालव यांचे सहकार्य लाभले

error: Content is protected !!