कोष्टी समाजबांधवांनी एकोपा कायम ठेवावा!

डाॅ. राजेंद्र उबाळे यांचे आवाहन

कणकवली येथे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

कोष्टी समाजाच्या उन्नती व प्रगतीसाठी समाजबांधवांनी एकसंघ राहिले पाहिजे. चौंडेश्वरी मंदिराच्या वर्धादिन सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्ग कोष्टी समाजाचा एकोपा दिसून येतो, ही बाब कौतुकास्पद आहे. समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे. समाजाच्या प्रगती व उन्नतीच्या कार्यात समाजातील युवा पिढीने पुढाकार घेतला पहिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोष्टी समाजबांधवांनी आपला एकोपा कायम ठेवावा, असे आवाहन डाॅ. राजेंद्र उबाळे यांनी केले.
चौंडेश्वरी मंदिराच्या २२ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त चौंडेश्वरी सभागृहात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला. याप्रसंगी डाॅ. उबाळे बोलत होते. प्रसाद मोहरकर, माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, विजय उर्फ नाना कांबळी, अनंत हजारे, नंदू उबाळे, गिरीष धुमाळे, श्रीकृष्ण हर्णे, मनोज निग्रे, राजेंद्र कवडे, आशिष पोयेकर, राजश्री धुमाळे, श्रद्धा हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
डाॅ. उबाळे म्हणाले, चौंडेश्वरी मंदिराच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचा सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजाने केलेला गुणगौरव त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या प्रेरणेतून हे विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहकार क्षेत्रात कोष्टी समाजाने सहभाग घेतला पाहिजे, अशी अपेक्षा प्रसाद मोहरकर यांनी व्यक्त केली. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या निधी राजेंद्र कवडे, रुद्र सुहास मुसळे, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा यश संपादन केलेल्या
मयंक रविकांत बुचडे, विभा गिरीष धुमाळे, दहावी परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या सार्थक सदानंद हर्णे, दूर्वा नागेश मुसळे
भावना मनोज कुमार निग्रे, यज्ञेश रुपेश मुसळे, पूर्वा अभिजीत मुसळे, बारावीच्या परीक्षेत ७५ टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या
वेदांत भूषण हर्णे, भावना श्रीकृष्ण ठाणेकर, मनस्वी अरविंद रोडी, स्नेहा मनोज मुसळे, विभांशू राजेश्वर उबाळे, पदवी परीक्षेत उत्तीर्ण
झालेल्या रजत मनोजकुमार निग्रे, साईदत्त नागेश मुसळे या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या गुणगौरव करण्यात आला. आरंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले. प्रास्ताविक श्रीकांत बुचडे यांनी केले. सूत्रसंचालन आर्या पोयेकर यांनी केले. आभार प्रदर्शन अनंत हजारे यांनी केले. या कार्यक्रमावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रुपाली हुन्नरे, पूजा मुसळे, भूषण हर्णे, सुधीर धुमाळे यांच्यासह समाजबांधवांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!