वाचन संस्कृती वाढविण्यासाठी नेहमी सहकार्य–जेरान फर्नांडिस

आचरा ग्रामपंचायत तर्फे वाचनायास प्रिटर भेट

वाचन संस्कृती वाढविण्यासाठी रामेश्वर वाचनालय चालवत असलेले उपक्रम कौतुकास्पद असून यासाठी आचरा ग्रामपंचायतचे नेहमी सहकार्य राहिल असे प्रतिपादन आचरा सरपंच जेरान फर्नांडिस यांनी रामेश्वर वाचन मंदिर येथे केले.
श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ग्रंथप्रदर्शन आयोजित केले होते.या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आणि प्रिटर प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांच्या सोबत वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे उपसरपंच संतोष मिराशी,ग्रामविकास अधिकारी पीजी कदम, वाचनालयाचे उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, सौ उर्मिला सांबारी, श्रीमती वैशाली सांबारी,भिकाजी कदम ग्रंथपाल विनिता कांबळी,विलास आचरेकर, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी,पंकज आचरेकर, चंदू कदम,ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब यांसह वाचनालय कर्मचारी, वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ग्रंथप्रदर्शन आयोजित केले होते. सदर ग्रंथप्रदर्शनात कथा, कादंबरी, बालसाहित्य, संदर्भ व इतर प्रकारची पुस्तके लावलेली होती. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून आचरा ग्रामपंचायतीने संस्थेच्या मागणीनुसार लीगल साईज प्रिंटर संस्थेस देणगीदाखल दिला.
पुस्तक दिनाचे महत्व या विषयावर संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या सौ.उर्मिला सांबारी यांनी आपले मत मांडले. आचरा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कदम व न्यू इंग्लिश स्कूल आचराच्या शिक्षिका सौ.मधुरा माणगावकर यांनीही वाचनाचे महत्व उपस्थितांना पटवून दिले. संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांनी वाचनाचे महत्व याबरोबरच आचरा ग्रामपंचायतला संस्थेच्या अपुऱ्या जागेबद्दल माहिती देऊन संस्थेच्या विस्तारित इमारतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.आभार
उपाध्यक्ष अशोक कांबळी यांनी मानले.

error: Content is protected !!