रामेश्वर देवस्थान तर्फे मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांचा सन्मान

संस्थान आचरे गावचा प्रसिद्ध रामजन्मोत्सव सोहळ्याला भेट देण्यासाठी आलेल्या मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांचा इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान चे अध्यक्ष प्रदीप गोपाळराव प्रभुमिराशी यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच धालवली ता.देवगड तलाठी सौ सुनीता मेस्त्री यांचाही देवस्थान अध्यक्ष प्रदीप प्रभूमिराशी यांच्या हस्ते सत्कार केला गेला.यावेळी देवस्थान समिती उपाध्यक्ष श्रीयांस कानविंदे, समिती सदस्य संजय मिराशी, अँड शिल्पन गांवकर, मंगेश मेस्त्री यांसह आचरा मंडल अधिकअधिकारी अजय परब आदी मान्यवर आदी उपस्थित होते.