शिवडाव तंटामुक्ती अध्यक्ष बंडू लाड यांच्या मातोश्री तारामती हरिश्चन्द्र लाड यांचे निधन.

कणकवली/मयूर ठाकूर.
शिवडाव ओटोसवाडी येथील तारामती हरिश्चन्द्र लाड यांचे आज पहाटे एक च्या दरम्यान वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.अत्यंत मनमिळावू आणि सामज्यस असा त्यांचा स्वभाव होता. वाडीतमध्ये पूर्वपार संस्कृती जपण्यासाठी त्यांचा सहभाग असायचा.शिवडावं गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आत्माराम (बंडू) हरिश्चन्द्र लाड यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पच्छात दोन मुलगे, दोन मुली, नाटवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे