गोपुरीतील चिकूच्या बागेतील व्यासपीठाला माधवराव गाडगीळ यांचे नाव

आश्रमातील परिसरात पत्रकार, पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण

गोपुरी आश्रमातील चिकूच्या बागेत व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या व्यासपीठाला पर्यावरण तज्ज्ञ माधवराव गाडगीळ यांचे नाव देण्यात आले. हा नामांतर सोहळा गुरुवारी सकाळी गोपुरी आश्रमाच्या पदाधिकारी व पत्रकारच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर गोपुरी आश्रमच्या ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, लक्ष्मीकांत भावे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, खजिनदार विनायक सापळे, संचालक संदीप सावंत, नितीन तळेकर, सदाशिव राणे, उप विभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, पत्रकार वीरेंद्र चिंदरकर, अजित सावंत, महेश सरनाईक, सुधीर राणे, स्वप्नील वरवडेकर, तुषार हजारे, विराज गोसावी, मयुर ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी गोपुरी आश्रमच्या पदाधिकारी व्यासपीठाला माधवराव गाडगीळ यांचे नाव देण्यामागील उद्देश सांगितला.

error: Content is protected !!