वृद्धावर हल्ला करणाऱ्या त्या कणकवलीतील मोकाट बैलाला अखेर पकडले

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या सूचनेनंतर कारवाई

कणकवली शहरामध्ये काही दिवसांपूर्वी एका वृद्धावर हल्ला करणाऱ्या मोकाट बैलाला अखेर आज नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी पकडले. नगराध्यक्ष संदेश पारकर व प्रशासनाच्या सूचनेनंतर ही कारवाई करण्यात आली. बाजारपेठेमध्ये या मोकाट फिरणाऱ्या बैलाने एका वृद्धावर हल्ला केला होता. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान त्यानंतर शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला होता. त्यामुळे या बैलाला पकडून त्या बाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून केली जात होती. अखेर त्या बैलाला आज कणकवली शहरामध्ये नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी पकडले.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!