हुमरमळा-वालावल येथे १ नोव्हेंबरला मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिर

जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत व उपाध्यक्ष दादासाहेब साहिल यांच्या हस्ते उद्घाटन; पंचक्रोशीतील रुग्णांना लाभ घेण्याचे आवाहन
हुमरमळा (वालावल) येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, धारगळ (गोवा) आणि ग्रामपंचायत हुमरमळा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १ नोव्हेंबर रोजी मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादासाहेब साईल यांच्या हस्ते होणार आहे.
या परिसरातील अनेक रुग्ण उपचारांसाठी धारगळ येथील आयुष रुग्णालयात जात असतात. रुग्णांचा प्रवासाचा त्रास कमी व्हावा आणि पंचक्रोशीतील नागरिकांना आयुर्वेदिक उपचारांचा लाभ स्थानिक स्तरावर मिळावा, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केलेल्या विनंतीनुसार या शिबिराला मान्यता मिळाली आहे.
या शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधे देण्यात येणार आहेत. त्यामुळे हुमरमळा-वालावलसह परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे आणि सरपंच अमृत देसाई यांनी केले आहे.






