मूळ खातेदाराला नोटीस न देताच तलाठ्याने सातबारा मध्ये नवीन नाव नोंदवले

देवगड तालुक्यातील खळबळजनक प्रकार
वृद्ध महिलेची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे कार्यवाहीची मागणी, अन्यथा आमरण उपोषण करणार
देवगड तालुक्यातील बुरंबावडे येथील एका जमिनी संदर्भात संबंधित मूळ खातेदाराला कोणत्याही प्रकारची कल्पना किंवा नोटीस न बजावता उंडिल तलाठी व यांनी सहहिस्सेदार म्हणून नावे नोंदविले याची सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी तेथील जमीन मालक निर्मला नार्वेकर यांनी देवगड तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे, मी गाव मौजे बुरंबावडे, ता. देवगड येथील रहिवासी असून मिळकत मौजे बुरंबावडे, ता. देवगड येथील खाते क्र. ७९, ६०४ या मिळकती माझ्या स्वतंत्र स्वमालकीचे आहेत. माझे वय वर्ष ८५ असून खाते क्र. ७९, ६०४ हि मिळकत माझ्या मुलाच्या नावे होती. माझ्या मुलाचा अपघाती मृत्यु सन १९८४ साली झाला. त्यानंतर वारसतपासावरून मी स्वतः निर्मला दत्ताराम नार्वेकर आणि मुली वारस लागल्या. तरी तलाठी श्रीम. सुनिता मेस्त्री यांनी माझ्या स्वतंत्र खात्यात सहहिस्सेदार म्हणून श्री. पंढरीनाथ विनायक नार्वेकर व इतर नावे घुसवण्याचे निदर्शनास आले. तरी याची सखोल कायदेशीर चौकशी व्हावी. व माझ्यावरील अन्याय दूर करावा नाही तर मला आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल. ह्या जमिनीबाबत मी स्वतः श्रीम. निर्मला दत्ताराम नार्वेकर वय वर्ष ८५ मी २ ऑक्टोबर २०२६ गांधी जयंती दिवशी उपोषणास बसली होती. याची नोंद घ्यावी.






