“श्री” डेंटल क्लिनिक चा उद्या कणकवलीत दिमाखात शुभारंभ

कणकवलीच्या वैद्यकीय क्षेत्रात दंतचिकित्सालयाचे नवीन केंद्र सुरू होणार

डॉ. तनुजा चिंदरकर, ॲड. अक्षय चिंदरकर यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन

कणकवली शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात एका नामांकित डेंटल क्लिनिकची अजून भर पडणार असून “श्री” डेंटल क्लिनिक चा शुभारंभ रविवार 6 एप्रिल 2025 रोजी दुपारी ४ वाजता दिवाणी न्यायालयासमोरील महाडिक कंपाऊंड कणकवली या ठिकाणी केला जाणार आहे. डॉ. तनुजा अक्षय चिंदरकर यांचे हे डेंटल क्लिनिक कणकवली शहरातील दंतचिकित्सा क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. या डेंटल क्लिनिकचा शुभारंभ ॲड. विद्याधर चिंदरकर यांच्या हस्ते केला जाणार असून डॉ. तनुजा चिंदरकर यांच्या रूपाने कणकवलीच्या वैद्यकीय क्षेत्रात अजून एक नवीन दंतचिकित्सा उपचाराचे केंद्र कणकवली सह जिल्ह्याच्या सेवेत येणार आहे. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. तनुजा चिंदरकर, ॲड. अक्षय चिंदरकर यांनी केले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!