राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले रत्नागिरीत स्वागत

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देखील घेतली भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रत्नागिरी दौर्यावर आले असता सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी रत्नागिरी विमानतळ येथे भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी कणकवली शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य विलास गावकऱ् आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आज रत्नागिरी दौर्यावर असताना सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी रत्नागिरी येथे भेट घेऊन सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षाच्या संघटने बाबतीत चर्चा केली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना पुष्पगुच्छ देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले प्रांतिक सदस्य विलास गावकर आदी उपस्थित होते.